गडचिरोली : गेल्या आठवड्यात जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा तापमानाच वाढ झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला असून गुरूवारी गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामानात खात्याने वर्तवली आहे.

1 आणि 2 एप्रिलला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर गुरूवार दि.3 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत विजांचा कडकडाट आणि गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 4 एप्रिलपासून मात्र वातावरण निरभ्र राहणार आहे.
हवामान विभागाचा हा अंदाज पाहता शेतकऱ्यांसह सर्वांनी गुरूवारी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

































