गडचिरोली : मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा आज संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमीदरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज त्या सप्ताहाची सांगता होईल. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये गोपालकाल्याचे आयोजन केले आहे.
काही ठिकाणी पालखी मिरवणूक तर शहरी भागात शोभायात्रा काढली जाणार आहे. यानिमित्ताने चौक आणि रस्त्यांना भगव्या पताका लावून सुशोभित केले जात आहे. गडचिरोली शहरातही शोभायात्रेचे आयोजन केले आहे.