गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे श्रीराम जन्मोत्सव पर्वानिमित्त श्रीमद् भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिराच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भागवत सप्ताहात सांगितले जाणारे चांगले विचार ग्रहण करून ते कृतीत आणल्यास जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ.नेते म्हणाले.
31 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत झालेल्या भागवत सप्ताहात ध्यानपाठ पुजा, रामधून पालखी, सत्संग कार्यक्रम, प्रार्थना व हरिपाठ, भजन, कीर्तन, श्रीरामकथा, गोपाळकाला असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कथा प्रवक्ते ह.भ.प. भागवताचार्य बाळकृष्ण सुरासे महाराज (साईधाम सेवाश्रम, शिर्डी) हे होते.
या भेटीत मा.खा.डॅा.अशोक नेते यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट मिळाल्याबद्दल अमिर्झा या गावातील नागरिक व श्रीमद् भागवतातील मंडळाच्या सदस्यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, सिनेट सदस्य स्वरूप तारगे, सामाजिक नेते देवीदास नागरे, डॉ.प्रमोद धारणे, संजय कोतपल्लीवार, चंदु करंडे, सुरेश नागरे तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.