सिरोंचा : शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सकाळी घडली. यात सिरोंचा शहरातील प्रभाग क्र.16 मध्ये असलेले गणेश पोचम मंचरला यांचे जवळपास 10 लाखांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांनी मंचरला कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी घराची पाहणी करत दु:खी कुटुंबीयांना धीर दिला. याशिवाय त्यांना आर्थिक मदतही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर किलोरी, नगरसेवक सतीश भोगे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सलाम शेख, चंद्रकला अनपरती, मदनया मादेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.