उष्मघाताने एकही जीव जाऊ नये; आवश्यक त्या उपाययोजना करा

खा.डॉ.नामदेव किरसान यांची सूचना

गडचिरोली : मागील काही दिवसात प्रचंड उष्णता वाढल्याने नागरिकांची प्रचंड होरपळ होत आहे. वाढत्या उष्णतेसोबतच अनेक नागरिक उष्णतालाटेच्या प्रभावात येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी गुरूवारी रुग्णालयाला भेट दिली. उष्माघाताने एकाही नागरिकाचा जीव जायला नको, या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आरोग्य प्रशासनाला केल्या.

इतरही आजारांवर योग्य ते उपचार, रुग्णांना पुरेसा औषधोपचार देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या भेटीप्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, डॉ.सतीशकुमार सोळंकी, डॉ.मनिष मेश्राम यांच्यासह शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने उपस्थित होते.

यावेळी खा.डॉ.किरसान यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची पाहणी करून रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.