आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली खोंडे परिवाराची सांत्वनपर भेट

स्व.विजय खोंडे यांना श्रद्धांजली अर्पण

अहेरी : येथील माजी प्राचार्य डॉ.विजय खोंडे यांचे 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मात्र उपचारासाठी बाहेर असलेले माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम हे परत आल्यानंतर त्यांनी खोंडे परिवाराची नागपूर येथील खोंडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी (दि.22) सांत्वनपर भेट घेऊन त्यांना श्रद्धांजही वाहिली.

माजी प्राचार्य डॉ.विजय खोंडे हे शैक्षणिक क्षेत्रात चिकित्सक, मेहनती , प्रामाणिक, विश्वासू होते. सोबतच त्यांनी अतूट नाते व जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे भावोद्गगार धर्मरावबाबांनी व्यक्त करून खोंडे कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी डॉ.विजय खोंडे यांच्या पत्नी जयश्री खोंडे, भाऊ सेवानिवृत्त अभियंता संजय खोंडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार संध्या खोंडे, व्याही रमन मोहितकर, प्रेमा मोहितकर, दीपाली खोंडे, विरंज उकिनकर आदी उपस्थित होते. या भेटीप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत साहेबराव देशमुख, राजेश पुरी, भूषण तल्हार होते.