गडचिरोली : विधाता दिव्यांग संस्था घोट यांच्या माध्यमातून निराधार, दिव्यांग, घटस्फोटीत, विधवा यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात परिसरातील सहा ते सात गावांतून निराधार, दिव्यांग घटस्फोटीत विधवा महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. दिव्यांग, निराधार आणि गरजूंच्या समस्या आपण शासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी माजी जि.प.सदस्य कुसूम अलाम यांनी सांगितले.

दिव्यांगांची गॅरंटी कोणी घेत नसल्याने त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांना अनुदान स्वरूपात कर्ज मिळाले पाहिजे. शिवाय दिव्यांगांचे इतर साहित्य मिळावे इत्यादी मागण्या आहेत. निराधारांच्या खात्यात चार-पाच महिन्यांपासून पैसे जमा झाले नाही, घरकुल हप्तेही मिळाले नाहीत. या सर्व मागण्या शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवून लवकरच परिसरात विविध प्रकारच्या योजना मिळण्यासाठी, जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कॅम्प लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुसूम अलाम म्हणाल्या. यावेळी महिलांनी विविध समस्यांना वाचा फोडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली दुधबावरे, तसेच सदस्य रेखा संगिडवार माजी जि.प.सदस्य सुगाबाई आत्राम, संस्थेच्या अध्यक्ष मंगला कुळसंगे, आरती कंगाले, हसिना शेख, विद्या पराते, रुपा शहा व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संचालन अंकीत जोशी यांनी केले. सचिन साखरकर यांनी प्रास्ताविक केले.

































