रब्बीच्या धान खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदतवाढ

वंचित शेतकऱ्यांना होणार लाभ

गडचिरोली : रब्बी पणन हंगाम 2024-25 अंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत आता 20 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनेक शेतकऱ्यांची खरेदी पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिल्याने शासनाने धान खरेदीसाठी ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली धान विक्रीची नोंद पूर्ण करावी, तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्था, खरेदी केंद्रे आणि संबंधित यंत्रणांनीही या मुदतीचा लाभ घेऊन खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.