शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची पं.स.वर धडक

हर्षवर्धनबाबांनी केली चर्चा

अहेरी : येथील पीएम श्री मॉडेल शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि.17) अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात पंचायत समितीवर धडक देऊन संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण यांची भेट घेतली.

पीएम श्री शाळेत सहावी ते बारावीचे 235 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र त्यांना शिकवण्यासाठी केवळ 3 शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेची समस्या मांडल्यानंतर बीडीओ चव्हाण यांनी तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्कती रण्याचे आश्वासन दिले. येत्या दोन दिवसात शाळेला शिक्षक पुरविणार असल्याचे बीडीओ चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी सुरेंद्र अलोणे, महेश बेझंकीवार, कुरेशी मामू, संदीप आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच काही पालकही उपस्थित होते.