अहेरी : महागाव खुर्द येथील बिचू रामा सडमेक या शेतकऱ्याचा रविवारी (दि.20 जुलै) संध्याकाळी नाल्याच्या पुरात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. काही कामानिमित्त शेताकडे जात असताना अचानक आलेल्या पुरात तोल जाऊन ते पडल्याची माहिती आहे. (अधिक बातमी खाली वाचा)
मृतदेह नेण्यासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी खाजगी वाहन उपलब्ध करून दिले. एवढेच नाही तर मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीही आर्थिक मदत केली. सडमेक कुटुंबाचा आधार गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सडमेक कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी महागावचे ग्रा.पं. सदस्य राजू दुर्गे, श्रीनिवास आलम, गणेश चौधरी, दामाजी सडमेक, हणमंतु चेन्नरुवार, संतोष मरपल्लीवार, चंद्रकला कोडापे (पोलीस पाटील, महागाव), प्रविण दुर्गे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.