आरमोरी : तालुक्यातील गणेशपूर, शिर्सी, बोळधा, बोरी आणि वळधा या गावांमध्ये रानटी हत्तींनी उपद्रव करत नुकत्याच रोवणी केलेल्या पीकांची हाणी केली. या नुकसानीची पाहणी माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केली. शेतातील पिकांसोबत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे यावेळी दिसून आले. (अधिक बातमी खाली वाचा)
या पाहणीच्या वेळी मा.आ. गजबे यांच्यासोबत भाजपचे सचिव नंदू पेट्टेवार, मंगेश चापले, सहाय्यक वनक्षेत्र अधिकारी श्रीकांत सेलोटे, सरपंच तुलावी तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माजी आमदार गजबे यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि यावर योग्य कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
































