गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याच्या मागणीसाठी मंदिर आणि उत्तरवाहिनी वैनगंगा नदीची 108 परिक्रमा सुरू करणाऱ्या संत मुरलीधर महाराजांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यादरम्यान गडचिरोलीतील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
मुरलीधर महाराजांनी आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांच्या मध्यस्थीनंतर परिक्रमा थांबविली. मात्र प्रकृती सुधारल्यानंतर आपण पु्न्हा आंदोलनाला बसणार असा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान व्यापारी असोसिएशनच्या वतीने गुरूदेव हरडे, मनोज देवकुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महाराजांची भेट घेऊन चर्चा केली.