गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे महाअधिवेशन गोवा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये 7 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला संपूर्ण देशातून ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून 250 ओबीसी बांधव हजेरी लावणार आहेत. त्यापैकी 50 ओबीसी बांधवांचा पहिला जत्था 31 जुलै रोजी गडचिरोलीवरून रवाना झाला आहे.

ओबीसींच्या विविध समस्यांवर या महाअधिवेशनात विचारमंथन होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत करणार आहे. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी 7 आॅगस्ट 1990 रोजी मंडल आयोग लागू केला, त्यामुळे देशातील ओबीसी बांधवांना सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण मिळाले. या सोन्याच्या दिवसाचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या दिवशी विविध राज्यात महाअधिवेशन घेऊन ओबीसींच्या समस्यांवर मंथन करण्यात येते.

































