फार्मर आयडीशिवाय घ्या आता पीक विमा योजनेचा लाभ

वनहक्कधारकांसाठी काढले पत्र

picture of one hand holding rice .

गडचिरोली : खरीप हंगाम 2025 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण सवलत जाहीर केली आहे. यात भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या 8 ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार, राज्यातील सर्व वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी अद्याप उपलब्ध होत नसल्याने, अशा शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीशिवायही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुभा देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटात आर्थिक सुरक्षा देणारी योजना आहे. यात कमी प्रीमियम दरात व्यापक विमा कवच मिळते. शेतकऱ्यांनी ही संधी साधून आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.