गडचिरोली : गेल्या 26 जुलै रोजी एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या वाघेझरी ग्राम पंचायतचे ग्राम रोजगार सहाय्यक अनिल शेंडे हे भात रोवणीसाठी शेतात ट्रॅक्टरने चिखलणी करताना ट्रॅक्टर उलटल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेंडे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खद आघात झाला. त्यामुळे ग्राम रोजगार सहाय्यक जिल्हा संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्व तालुका संघटनांनी निधी गोळा करून जिल्हा संघटनेच्या नेतृत्वात वाघेझरी येथे अनिल शेंडे यांच्या घरी सांत्वनपर भेट देत आर्थिक मदत कुटूंबियांना सुपूर्द केली.
राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यासाठी ग्राम पंचायत स्थरावर ग्राम रोजगार सहाय्यक तटपुंज्या मानधनावर काम करतात. मानधन वेळेवर उपलब्ध होत नाही म्हणून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरिता ते अन्य कामे करून कुटुंबाला हातभार लावतात. यातूनच अनिल शेंडे ट्रॅक्टरने चिखलणी करत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
संघटनेच्या वतीने मदतनिधी शेंडे कुटुंबास सुपूर्द करताना जिल्हाध्यक्ष मंगेश फुकटे, जिल्हा सल्लागार दीपक प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष मुक्तेश्वर गंगाधरीवार, वाघेझरीचे सरपंच विलास कोदामी, ग्रामपंचायत अधिकारी मारोती खरात, ग्रामसभा अध्यक्ष सुधाकर गोठा, ग्राम पंचायत सदस्य रघुनाथ मोहूर्ले, गडचिरोली तालुका अध्यक्ष राजू मुनघाटे, विकास सरकार, अनिल आलाम, रमेश बामनकर, किशोर सोमनकर, जालंधर बोदेले , शालिक जेंगटे, विनोद बुद्धे, मनोज सोनुले, साईनाथ कुडमेथे, प्रकाश शेन्डे, रामाजी दुर्वा, सुखदेव माल, अतुल मठ्ठामी, सिरोंचातून श्रीनिवास दुर्गम, रोहितकुमार सद्दी तसेच जिल्यातील बहुसंख्य ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते.