आष्टी : दोघांच्या सुखी संसारात तिसरीने प्रवेश केल्याने संसाराला ग्रहण लागले. यातून पतीकडून पत्नीचा शारीरिक-मानसिक छळ सुरू झाल्याने अखेर पत्नीने आत्महत्येचा मार्ग पत्करला. याप्रकरणी पती आणि त्याच्या प्रेयसीला आष्टी पोलिसांनी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, आष्टी येथील पराग दिवाकर कुंदोजवार याचा गडचिरोली येथील प्रियंका हिच्याशी विवाह झाला होता. दोघांचा संसार व्यवस्थित सुरू असताना पराग याचे त्याची कॅालेजमधील मैत्रिण प्रियंका हिच्याशी सूत जुळले. ती नागपूरमध्ये राहाते. पण तिच्याशी सूत जुळल्यानंतर पराग आणि प्रियंका यांच्या संसाराला ग्रहण लागले. दोघातील प्रेमसंबंधाची माहिती प्रियंकाला झाल्यानंतर परागकडून तिचा शारीरिक-मानसिक छळ सुरू झाला. त्यातूनच गेल्या 14 आॅगस्टला तिने आत्महत्या केली.
दरम्यान प्रियंकाची आई सुवर्णा कत्रोजवार (रा.गडचिरोली) यांनी परागच्या विवाहबाह्य संबंधातून होणाऱ्या छळामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आष्टी पोलिसांनी आधी परागला आणि मंगळवारी (दि.19) त्याची प्रेयसी पल्लवी हिला नागपूर येथून अटक केली.