गडचिरोली : भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मध्यवर्ती झोनच्या उपाध्यक्षपदी आदिवासी सेवक घनश्याम लहुजी मडावी यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरलाल बोदट यांनी ही नियुक्ती केली.
आदिवासी विकास परिषदेच्या मध्यवर्ती झोनच्या अंतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड ही राज्ये येतात. या परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते हे आहेत. तर उपाध्यक्षांमध्ये महाराष्ट्रातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे हे या परिषदेवर आहेत.