आदिवासी परिषदेवर निवड, घनश्याम मडावी यांचा सत्कार

नागरी सह.बँकेचे आयोजन

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद दिल्लीच्या मध्यवर्ती झोनच्या उपाध्यक्षपदी घनश्याम मडावी यांची निवड झाल्याबद्दल देसाईगंज नागरी सहकारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मडावी यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानासाठी राज्य शासनाकडून आधीच त्यांना आदिवासी सेवक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आता आदिवासी विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीत निवड झाल्याने त्यांना आणखी योगदान देण्यास वाव मिळणार आहे. त्यामुळे देसाईगंज नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष या नात्याने घनश्याम मडावी यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश तापकर, मानद सचिव विजय दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंदा परचाके, संचालक प्रा.देवानंद काडी, अरुण साळवे, विठ्ठ्लराव गेडाम, राजू आकरे, दिलीप खेवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.