सॉफ्टबॉल व बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा केला सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रम

गडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सॅाफ्टबॅाल आणि बॅाल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, सॉफ्टबॉल व बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, आंतरराष्ट्रीय बॉल बॅडमिंटन खेळाडू प्रा.रूपाली पापडकर तालुका क्रीडा संयोजक खुशाल मस्के, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी नाजूक उईके, वरारकर, बडगेलवार, योगेश चव्हाण, भूपेंद्र चौधरी, मनीष बानबले आणि खेळाडू वर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सॉफ्टबॉलची गडचिरोली जिल्ह्याची सुवर्णकन्या आणि 14 वर्षीय शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी आभा संग्रामे, तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या स्टार बॉल बॅडमिंटनपट्टू व राष्ट्रीय खेळाडू माधवी कळते, निधी जांभुळकर, राधिका मगरे, मोहिनी पिंपळखेडे आणि विनय कोवे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.