चामोर्शी-गडचिरोली महामार्गावर खड्ड्यांच्या दुरुस्तीला आला वेग

मा.खा.डॉ.अशोक नेते यांचे प्रयत्न

खड्ड्यांची पाहणी करताना मा.खा.डॅा.अशोक नेते, सोबत इतर पदाधिकारी.

गडचिरोली : चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुरुड गावाजवळच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यामुळे गिट्टी टाकून खडीकरणाद्वारे हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वी चामोर्शी दौऱ्यात चामोर्शी नगर पंचायतीचे नगरसेवक आशिष पिपरे यांनी या खड्ड्यांबाबतची स्थिती मा.खा.डॉ. नेते यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे डॅा.नेते यांनी स्वतः रस्त्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दखल घेत हे काम युद्धपातळीवर सुरू केले. या तातडीच्या दुरुस्तीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.