मागणीच्या तुलनेत खतांचा पुरवठा कमी असल्याने टंचाई

नॅनो युरियाचा वापर करा

गडचिरोली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची 30 हजार 185 मे.टनाची मागणी, तसेच इतर मिश्रखतांची 72 हजार 620 मे.टन मिळून एक लाख मे.टनपेक्षा जास्त खतांची मागणी केली होती. मात्र कृषि आयुक्तालय पुणे यांच्याकडून 20 हजार 467 मे.टन युरिया आणि इतर खते मिळून एकुण 57 हजार 672 मे.टन खताचे आवंटन मंजुर केले आहे. त्यामुळे जिल्हाभर खतांच्या टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

कालपासून जिल्ह्यात 1035 मे.टन खताचा पुरवठा सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे 15 सप्टेंबरपर्यंत 1400 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे. मिश्र खतांमध्ये 20:20:013 हे 2825 मे.टन उपलब्ध होणार आहे. युरिया खताची कमतरता भासल्यास शेतकऱ्यांनी फवारणीद्वारे नॅनो युरियाचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.