राज्यस्तरीय बॅाल बॅडमिंटन स्पर्धेसाठी आज निवडणार संघ

गोंडवाना विद्यालयात निवड चाचणी

गडचिरोली : सीनियर व सब ज्युनिअर गटाकरिता बॉल बॅडमिंटन जिल्हा निवड चाचणीचे आयोजन आज, दि.10 सप्टेंबर रोजी येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात केले जाणार आहे.

चंद्रपूर बॉल बॅडमिंटन असोसिएशनद्वारा 11 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान वरिष्ठ गट राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा व अहिल्यानगर बॉल बॅडमिंटन असोसिएशन तर्फे 16 ते 19 सप्टेंबरदरम्यान सब ज्युनियर बॉल बॅडमिंटन राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्याकरिता गडचिरोली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी ही निवड चाचणी होणार आहे.

गोंडवाना सैनिक विद्यालय येथे 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजतापासून ही निवड चाचणी सुरू होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गडचिरोली संघाचे प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्य खेळाडूंनी आधार कार्डची सत्यप्रत व सब ज्युनियर बॉल बॅडमिंटन राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र व आधार कार्डची सत्यप्रत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.