गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचा वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात काल दि.9 सप्टेंबर रोजी गोकुळनगरातील आशीर्वाद सभागृहात गण्यारपवार फाउंडेशन चामोर्शी आणि महात्मे आय हॅास्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू तपासणी शिबिर घेण्यात आले.
जिल्ह्यात गतिमंद मुलांसाठी शालेय गणवेश वितरण, महिलांना ब्लँकेट वाटप, रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान, वृक्षारोपण, यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गडचिरोलीचे शहर अध्यक्ष विजय गोरडवार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश चिटणीस अॅड.संजय ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, गण्यारपवार फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अमोल गण्यारपवार, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष वैभव शिवणकर, माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, सामाजिक कार्यकर्ते भास्कर निमजे, जिल्हा उपाध्यक्षा विमल भोयर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, युवक शहर अध्यक्ष विवेक कांबळे, ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षा नीता बोबाटे, करिश्मा चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिरात 250 लोकांची मोफत तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले. तसेच जवळजवळ 100 हून अधिक रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोनू पठाण, बेबी लभाणे, मल्लया कालवा, नीलेश कोटगले, राजू डांगेवार यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.