येणाऱ्या निवडणुकांना सर्वांनी एकजुट दाखवत सामोरे जावे

काँग्रेसच्या बैठकीत आवाहन

मार्गदर्शन करताना खा.डॅा.नामदेव किरसान, मंचावर मा.खा. कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व इतर.

गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक येथील महाराजा सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडली. या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन एकजुटीने सामोरे जाण्याचे आवाहन नेत्यांनी केले.

काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित आणि वंचितांच्या हक्कासाठी सदैव लढा देणारा पक्ष आहे. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे ऐतिहासिक योगदान असून हे योगदान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारावी, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.

या बैठकीला खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा निरीक्षक तथा आरमोरी विधानसभा निरीक्षक अॅड.सचिन नाईक, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेश सिंगलकर, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोष रावत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जि.प.अध्यक्ष व प्रदेश सचिव अजय कंकडलावार, प्रदेश सचिव हनुमंतू मडावी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, माजी जि.प. उपाध्यक्ष व कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा.नाट, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, काँग्रेस नेते जेसा मोटवानी यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सेल अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.