चामोर्शी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) वतीने चामोर्शी येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा चामोर्शी नगरपंचायतचे सदस्य अमोल गण्यारपवार, राकाँचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, चामोर्शी तालुका अध्यक्ष कबीरदास आभारे, जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश परसोडे, भामरागड तालुका अध्यक्ष मंगेश मट्टामी, मुलचेरा तालुका अध्यक्ष अशोक आरके, दुमदेव सातार, गुलाब धोती, गणपती भंडारी, गुरुदास गलाइ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांचा निषेध नोंदविला.
































