अहेरी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्वागत कमान उभारण्यासाठी ग्राम पंचायतीने आधी रितसर परवानगी दिली होती. तरीही कमान अनधिकृत ठरवून ग्राम पंचायत प्रशासनाने 16 जून रोजी पाडून टाकली. हे जातीयवादाचे लक्षण असून कमान पाडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
डॉ.आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडण्यात आल्यानंतर आंबेडकरप्रेमींनी दोषीवर कारवाईसाठी सात दिवस उपोषण, मोर्चा, मुंडण आंदोलन केले. अखेर बेडग गावातून बाहेर पडत मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात आला. गाव सोडण्याचा निर्धार केला. फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार लाजीरवाना आणि निंदणीय आहे. त्यामुळे या घटनेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अलोणे यांनी केली.