गडचिरोली : शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, मच्छीमार, मेंढपाळ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू उद्या (दि.24) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडचिरोलीजवळील पारडीसह आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, देसाईगंज तालुक्यातील कुरूड या ठिकाणी त्यांची संघर्ष यात्रा पोहोचणार आहे. याशिवाय आरमोरीत दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

चंद्रपूरवरून सकाळी 11 वाजता ही संघर्ष यात्रा पारडी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर डोंगरगाव बस थांब्यावर त्यांचे स्वागत होईल. दुपारी 1 वाजता आरमोरीतील साई दामोधर मंगल कार्यालयात दुपारी 2.30 वाजता दिव्यांग मेळावा आणि सायंकाळी कुरूड येथील मारोती मंदिर, झुरे मोहल्ला, तर सायंकाळी 7 वाजता आरमोरीच्या इंदिरा गांधी चौक, टिळक चौकात देवीचे दर्शन घेऊन ते रवाना होतील.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आले आहे.
































