अहेरीच्या राजवाड्यात नवदुर्गा विराजमान, परिवाराची उपस्थिती

आ.धर्मरावबाबांनी केली प्रार्थना

अहेरी : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजवाड्यात दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे सोमवारी नवरात्रौत्सवानिमित्त नवदुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अतिशय भक्तिमय वातावरणात डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत मातेचा प्रतिष्ठापना सोहळा झाला.

यावेळी धर्मरावबाबांचे पुत्र हर्षवर्धनबाबा आत्राम, तनुश्रीताई आत्राम, किष्किंदराव आत्राम आणि राजपरिवारातील अन्य सदस्य व भाविक उपस्थित होते. याप्रसंगी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी राज्यात सुख, शांती, आणि समृद्धी नांदो, आणि सर्वजण सुजलाम् सुफलाम् होवोत अशी मातेचरणी मनोकामना केली.