शिंपी समाजाची गडचिरोली तालुका कार्यकारिणी गठीत

नागपुरातील मेळाव्यावर मंथन

गडचिरोली : शिंपी समाजबांधवांची सहविचार सभा रविवारी (दि.28) राज्य परिषदेचे अध्यक्ष राजेश वडपल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नागपूर येथे होणाऱ्या शिंपी समाजाच्या मेळाव्याच्या तयारीवर विचारविमर्श करून गडचिरोली तालुका कार्यकारिणीचे गठण करण्यात आले.

या सभेला प्रामुख्याने माजी अध्यक्ष नामदेवराव गंधेवार, सतीश नंदगीरवार, प्रविण रामगीरवार, भुपेश लोडल्लीवार, भाऊ मारशेट्टीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मेळाव्याच्या अनुषंगाने येत्या दि.5 ऑक्टोबरला सभा आयोजित करण्याचे निश्चित झाले. सर्व तेलगू शिंपी समाज बांधव आणि मराठी शिंपी समाजबांधव मिळून संयुक्त सभा आयोजित करण्याचा निर्णय यावेळी झाला. जिल्हास्तरावर समाजभवन व्हावे याबाबतही यावेळी चर्चा करून त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. 5 ऑक्टोबरला होणाऱ्या सभेला सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

अशी आहे गडचिरोली तालुका कार्यकारिणी

रवींद्र नामदेवराव गंदेवार (अध्यक्ष), किशोर नंदगीरवार (उपाध्यक्ष), प्रवीण रामगिरवार (सचिव), भूपेश लोडल्लीवार (सहसचिव), मोरेश्वर रामगिरवार (कोषाध्यक्ष), प्रणय गंधेवार (प्रसिद्धी प्रमुख), आणि सदस्यांमध्ये गजानन मारशेट्टीवार, संदीप इजगिरावार, अभय गटलेवार, रवींद्र करनेवार, प्रशांत मुपिडवार, अक्षय लोडेल्लीवार, दिलीप गंदेवार, देवेंद्र कोरगंटीवार, प्रभा मारशेट्टीवार, प्रभा लोडेल्लीवार, सोनाली आक्केवार यांचा समावेश आहे.