कलार समाजाचा कोजागिरी व स्नेहमिलन कार्यक्रम 12 ला

गुणवंतांसह ज्येष्ठ मंडळींचा सत्कार

गडचिरोली : कलार समाज संघटना गडचिरोलीची सभा रविवारी (दि.28) दुपारी अभिनव लॅान येथे निरंजन पाटील वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्ववर्गीय कलार समाजाचा कोजागिरी व स्नेहमिलन कार्यक्रम येत्या 12 ऑक्टोबरला (रविवारी) आयोजित करण्याचे एकमताने ठरले.

सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणाऱ्या या कोजागिरी स्नेहमिलनात 10 वी आणि 12 वी मध्ये 80 टक्के गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच 75 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींचा आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, तथा पदोन्नती आणि शासकीय सेवेत नव्याने नियुक्ती झालेल्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी लहान मुलांचे, महिलांसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण होणार आहे. या सदर कार्यक्रमास तेलगु कलार, गौड कलार, कोसरे कलार, सोनकर कलार, मराठा कलार इत्यादी प्रवर्गातील समाज बांधवांनी कुटुंबासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

या सभेला निरंजन पाटील वासेकर, सुनील चडगुलवार, दिलीप मेश्राम, दिलीप गडपल्लीवार, राजेंद्र गडपल्लीवार, किर्तनलाल मेश्राम, नरेंद्र बोरकर, व्यंकटेश कंबगौनी, नामदेव बनसोड, मोरेश्वर वालोदे, विजय मारकवार इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.