गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गडचिरोली विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक आज दि.1 रोजी (बुधवारला) चामोर्शी येथे होणार आहे. लौकिक भिवापुरे यांच्या घरी दुपारी 3 वाजता होणाऱ्या या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात नियोजन केले जाणार आहे.
जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला गडचिरोली विधानसभा अध्यक्ष डॉ.तामदेव दुधबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, प्रदेश सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष विवेक बाबनवाडे, धानोरा तालुकाध्यक्ष सरफराज शेख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल नैताम, प्रदेश सरचिटणीस लौकिक भिवापुरे, चामोर्शी तालुकाध्यक्ष डॉ.नोमेश जुवारे, निशांत नैताम, जिल्हा संघटन सचिव डॉ.हेमंत भाकरे पाटील, रायुकाँचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष प्रणय बुर्ले आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.