गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण, सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत गडचिरोली शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.नेते यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत “शुगर, बी.पी. यांसारख्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी भाजचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गीता हिंगे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांच्यासह विनोद देवोजवार, संजय मांडवगडे, कविता उरकुडे, सीमा कन्नमवार, अल्का पोहनकर, भावना हजारे, भारती खोब्रागडे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मा.खा.डॉ.नेते यांनी रामनगर येथील दुर्गा देवीचे दर्शन घेऊन जय माँ बाल दुर्गा मंडळाला सदिच्छा भेट दिली.