उत्सवांमधून सामाजिक ऐक्याला मिळतेय बळ- कृष्णा गजबे

कुरखेडातील शारदोत्सवात सत्कार

शारदा मंडळात मा.आ.गजबे यांचा सत्कार करताना.

कुरखेडा : शहरात शारदा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. विविध मंडळांकडून आकर्षक मंडप व देखावे उभारण्यात आले आहेत. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी कुरखेडा शहरातील सार्वजनिक शारदा उत्सव महिला मंडळ राणा प्रताप वॉर्ड, फ्रेंड्स दुर्गा उत्सव मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून सामाजिक ऐक्याला बळ मिळते, त्यामुळे मंडळांनी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी कृष्णा गजबे यांनी केले.

या भेटीत गजबे यांनी मंडपाच्या सजावटीची पाहणी करण्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली. मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांनी त्यांचे स्वागत करून उत्सवातील वैशिष्ट्यांची माहिती दिली. मंडळातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.