गडचिरोली : महर्षी वाल्मिक ऋषी यांची प्रेरणा घेऊन समाजाचा विकास करावा, असे आवाहन माजी पं.स.उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले. महर्षी वाल्मिक ऋषी यांनी केलेले कार्य सर्वांना माहित असून त्यांच्या कार्याचा प्रसार व प्रचार करुन समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पोर्ला येथे आयोजित महर्षि वाल्मिक ऋषी जयंती सोहळ्यात ते बोलत होते.

पोर्ला येथे प्रथमच ढीवर, भोई, केवट समाजाने एकत्रितपणे हा कार्यक्रम घडवून आणला. त्यासाठी सर्व आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. येणाऱ्या काळात महर्षी वाल्मिक ऋषी यांची मूर्ती स्थापनेसाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दशमुखे यांनी दिले. या अगोदर समाज मंदिराचे आश्वासन देऊन आपण ते पूर्ण केले आहे. माजी आमदार डॅा.देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीमधून सदर समाज मंदिर निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला माजी विस्तार अधिकारी उकंडाराव राऊत, भाजपचे तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, तालुका महामंत्री रमेश नैताम, पोर्ला तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाल गेडाम, दुधराम सहारे, चंदू गेडाम, श्रीधर भोयर, शालीक भोयर, तुळशीदास दाणे, पांडू भोयर, बंटी उपासे, कुसुम उपासे आदी मान्यवर उपस्थित होते.
महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक रामचंद्र राऊत यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन शालिक भोयर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

































