दिवाळीपूर्वी सिंधी विस्थापितांच्या जमिनीचे नियमन पूर्ण करा

देसाईगंज एसडीओंना निवेदन

देसाईगंज : येथील सिंधी कॉलनीतील विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनीचे विशेष अभय योजना 2025 अंतर्गत शर्तभंग नियमानुकूलन करण्याची मागणी सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाने मा.आ.कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान यांच्याकडे केली.

यावेळी शिष्टमंडळाने दिवाळीच्या आधी सदर कार्यवाही पुर्ण व्हावी अशी विशेष विनंती केली. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष किशन नागदेवे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी उपस्थित होते.

निवेदनात शासन निर्णय दि.15 मे 2025 पासून चार महिने उलटूनही नियमनाची प्रक्रिया सुरु न झाल्याचे नमूद करून, गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सिंधी कॉलनी असलेल्या वडसा-देसाईगंज येथील प्रकरणे त्वरीत पूर्ण करावीत, जेणेकरून विस्थापितांना लाभ मिळेल, अशी मागणी करण्यात आली.