गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटी आणि गुरुकुल अकॅडमी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पोलीस भरतीच्या तयारीसाठी महास्पर्धेचे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडांगण, गडचिरोली येथे केले होते. या सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दोन हजारांवर स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला.

उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, प्रा.राजेश कात्रटवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, गौरव येनप्रेड्डीवार, गुरुकुल अकॅडमीचे संचालक पुष्पक सेलोकर, तसेच अनुप कोहळे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

“आजचा काळ स्पर्धेचा आहे. तरुणांनी परिस्थितीचे भान ठेवून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्कीच मिळते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झटणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,” असे प्रतिपादन यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

कार्यक्रमाचे संचालन तुषार दूधबावरे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी व गुरुकुल अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांणी परिश्रम घेतले.












