15 ऑक्टोबरपासून पुन्हा वादळी पावसाची शक्यता

पिकांना सुरक्षित ठेवावे लागणार

गडचिरोली : मान्सूनने आठवडाभरापूर्वी राज्यातून निरोप घेतल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर येत्या 15 ते 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भासह राज्याच्या इतर भागात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे ऐन पीक घरात येण्याच्या सुमारास वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.