गडचिरोली : ज्येष्ठ माओवादी नेता भूपती उर्फ मल्लोझुला वेणुगोपाल आणि छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण करणारा सतीश उर्फ टक्कलापल्ली वासुदेव यांच्याविरूद्ध माओवाद्यांनी पत्रक जारी करून त्यांना धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

तेलगू भाषेतील या पत्रकात वरिल आत्मसमर्पित नक्षली नेत्यांना गद्दार ठरवत त्यांच्यावर आगपाखड करण्यात आली. गडचिरोलीत भूपतीसह 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर छत्तीसगडमध्येही सतीश याच्या नेतृत्वात दिडशेपेक्षा जास्त माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यामुळे माओवाद्यांसाठी हा फार मोठा धक्का होता. पण या घडामोडीनंतरही आम्ही खचून जाणार नाही. संघटना पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

1 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भूपतीची पत्नी तारक्का हिने आत्मसमर्पण केल्यापासून भूपती हा पोलिसांच्या संपर्कात होता, असाही दावा नक्षली पत्रकातून करण्यात आला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

संपूर्ण हयात नक्षल चळवळीत काम करणाऱ्या भूपतीने काही दिवसांपासून संघटनेच्या वाटचालीवर इतर माओवादी नेत्यांसोबत मतभेत सुरू होते. संघटनेने सशस्र संघर्ष टाळून चर्चेतून मार्ग काढावा अशी भूपतीची भूमिका होती, पण इतर काही नेत्यांना ती भूमिका मान्य नव्हती. (अधिक बातमी खाली वाचा)

भूपतीने स्वत:च्या स्वार्थासाठी संघटनेतील इतर लोकांची दिशाभूल केली, त्यामुळेच इतक्या प्रमाणावर आत्मसमर्पण झाले. या विश्वासघातासाठी भूपती, सतीश यांना धडा शिकवा, असे आवाहन त्या पत्रकातून करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

मरणाला घाबरून शरणागती पत्करणाऱ्यांमुळे संघटना संपणार नाही, असा दावा करत शरण गेलेल्यांनी पुनर्विचार करत संघटनेत परत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्षल प्रवक्ता अभय याच्या नावे हे पत्रक जारी करण्यात आले आहे.











