आरमोरी : दिवाळीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून आरमोरी तालुक्यातील शिवणी बु. येथे सहारा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संचालित ‘सहारा क्रिकेट क्लब’च्या वतीने 12 व्या वर्षातील ‘हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

याप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देताना मा.आ.गजबे यांनी खेळात खिलाडूवृत्तीचे आणि शिस्तीचे महत्त्व सांगितले. “क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तर तो संघभावना, एकाग्रता आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणारे एक उत्तम माध्यम आहे,” असे सांगत गजबे यांनी स्पर्धेच्या निमित्ताने तरुणांना एकत्र आणून सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या सहारा बहुउद्देशीय संस्था आणि सहारा क्रिकेट क्लबच्या उपक्रमाचे कौतुक केले. (अधिक बातमी खाली वाचा)

“क्रिकेटमुळे तुम्हाला जीवनातील चढ-उतारांचा सामना कसा करायचा याची शिकवण मिळते. प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक षटकावर लक्ष केंद्रित करणे आणि शेवटपर्यंत हार न मानता प्रयत्न करत राहणे हेच या खेळाचे खरे यश आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

हे गुण तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतील. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून खेळाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे,” असा कानमंत्रही त्यांनी दिला. (अधिक बातमी खाली वाचा)

या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रु. 30,001, द्वितीय रु.20,001, तृतीय रु.10,001 आणि चतुर्थ बक्षीस रु.5,001 ठेवण्यात आले आहे. हे सामने हनुमान मंदिराच्या भव्य आवारात आयोजित करण्यात आले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू पेट्टेवार, डॅा.मसराम, माजी पं.स.सदस्य गीता ढोरे, शिवणीचे सरपंच पुरुषोत्तम दोनाडकर, उपसरपंच सुरेश ढोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदु नाकतोडे, राहुल तितीरमारे, देवाजी पिलारे, गुरुदेव ढोरे, महेंद्र शेंडे, महेश बुल्ले यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.












