कोरची तालुक्यातून शेकडो गोवंश जाताहेत कत्तलखान्यात

तस्करीला कुणाचा आशीर्वाद?

कत्तलखान्यात नेण्यासाठी एकत्रित केलेली जनावरे

कोरची : तालुक्यातील छत्तीसगड सीमेकडील भागातून मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरे कत्तलखान्यात नेली जात आहेत. मालवाहू वाहनातून होणाऱ्या या अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यात संबंधित यंत्रणेला अपयश का येत आहे, कुणाच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू आहे याकडे हा संशोधनाचा विषय झाला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

तालुक्यातील बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुडुकदुमा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या जागेत गो-तस्करांकडून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांना ठेवले जाते. याशिवाय इतरही काही ठिकाणी गो-तस्करांनी अड्डे बनविले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

छत्तीसगडमधून आणलेली आणि गडचिरोली, तसेच गोंदिया जिल्ह्यातून येणारी जनावरे त्या ठिकाणी ठेवली जातात. त्यांना त्या ठिकाणी एकत्रितपणे ठेवून नंतर मालवाहू वाहनाने नागपूर, हैदराबादच्या कत्तलखान्याकडे नेले जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

विशेष म्हणजे गाई, म्हशी, बैल यांना ज्या ठिकाणी एकत्रितपणे ठेवले जाते त्या ठिकाणी त्यांना चारा आणि पाणीही मिळत नाही. त्यातूनच बऱ्याच वेळा जनावरांचा मृत्यूही होतो. (अधिक बातमी खाली वाचा)

जनावरांचे अशा पद्धतीने हाल करणे, त्यांची अनधिकृतपणे वाहतूक करणे आणि त्यांना परवानगीशिवाय कत्तलखान्यात नेणे कायद्याने गुन्हा आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

तस्करांकडून रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे जनावरांना वाहनात कोंबून कत्तलखान्याकडे नेले जाते. कत्तलखान्याकडे जाईपर्यंत ही वाहने अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जातात, पण एखाद्याच वेळी थातूरमातूर कारवाई केली जाते. (अधिक बातमी खाली वाचा)

यात छत्तीसगडसह कोरची शहरातील गो-तस्कर सक्रिय आहेत. मात्र कळूनही वळत नसल्यासारखी पोलिसांची अवस्था आहे.