आरमोरी : तालुक्यातील जांभळी येथील रहिवासी असलेले दोन इसम मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास मानापूर- देलनवाडी- नागरवाही रस्त्याने आरमोरीकडे दुचाकीने येत असताना अचानक रस्ता ओलांडण्यासाठी चितळाने झेप घेतली. नेमकी त्याचवेळी दुचाकीची त्याला धडक होऊन दुचाकीसह त्यावरील दोघेही रस्त्यावर कोसळले. (अधिक बातमी खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, धनिराम पदा आणि रेवनदास उसेंडी हे दोघे दिवाळीचे सामान घेण्यासाठी आपल्या मोटरसायकलने आरमोरीकडे जात असताना अचानक नागरवाही जंगलाच्या मार्गाने अचानक चितळाने रस्ता ओलांडण्यासाठी झेप घेतली. (अधिक बातमी खाली वाचा)

वेगात असलेल्या दुचाकीस्वारांना ब्रेक लावणे शक्य झाले नसल्याने त्यांची चितळासोबत धडक झाली आणि दोघेही जण रस्त्यावर कोसळले. यामुळे दुचाकी चालत असलेले धनिराम पदा यांना गंभीर दुखावत तर मागे बसलेले रेवनदास उसेंडी यांना किरकोळ दुखापत झाली. (अधिक बातमी खाली वाचा)

या अपघातानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे आणण्यात आले. पण पदा यांना गंभीर दुखापत असल्याने त्यांना आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर होती. (अधिक बातमी खाली वाचा)

दरम्यान जांभळीच्या सरपंच अनती उसेंडी यांनी याबद्दलची माहिती जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिली. घोडाम यांनी लगेच आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पण धनिराम यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविणे गरजेचे होते. त्यांनी आमदार रामदास मसराम यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. त्यांनी जखमींना गडचिरोलीला हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यानंतर जखमी पदा यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके यांनाही याबाबतची सूचना देण्यात आली. तसेच देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण यांना मोका चौकशी करुन जखमींना मदत देण्याची सूचना आ.मसराम यांनी केली. (अधिक बातमी खाली वाचा)

याप्रसंगी रुग्णालयात निलेश अंबादे, रुपेश झंझाळकर, जखमींचे नातेवाईक उपस्थित होते. परंतु वनविभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते.











