कुटुंबियांपासून दूर कर्तव्यावरील पोलिसांची दुर्गम भागात दिवाळी

जिल्हाभरात फॅन्सी फटाक्यांची क्रेझ

गडचिरोली : दिवाळीसारखा वर्षातील सर्वात मोठा सण कुटुंबियांसोबत साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण आपल्या कर्तव्यामुळे कुटुंबियांपासून दूर जिल्ह्याच्या दुर्गम भागात आपली ड्युटी करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाच कुटुंबाचे सदस्य मानून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. (अधिक बातमी खाली वाचा)

नक्षलविरोधी अभियानामुळे जिल्ह्याच्या दुर्गम आणि संवेदनशिल भागात असलेल्या पोलीस स्टेशन, बेस कॅम्पमध्ये राहणाऱ्या मोजक्याच पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सुट्यांमध्ये घरी जाण्याची संधी मिळते. (अधिक बातमी खाली वाचा)

त्यामुळे बहुतांश कर्मचारी बंदोबस्ताच्या कर्तव्यावरच असतात. अशावेळी ठाण्याच्या बाहेरच कर्मचाऱ्यांनी फॅन्सी फटाके उडवत दिवाळीचा आनंद घेतला. तसेच मिठाई, फराळाचा आस्वाद घेऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (अधिक बातमी खाली वाचा)

सिरोंचा उपविभागांतर्गत मर्रीगुडम गावात पोलिसांची शाळकरी मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुलांना कपडे, फराळ, तसेच महिलांना साड्यांचे वाटप केले. (अधिक बातमी खाली वाचा)

याच पद्धतीने जिल्ह्याच्या इतरही अनेक अतिसंवेदनशिल भागात पोलिसांनी गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावकरी आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून केला जातो. (अधिक बातमी खाली वाचा)

फटाक्यांची क्रेझ कायम

गडचिरोलीकरांसह जिल्हाभरात मोठे आवाज करणाऱ्या फटाक्यांची क्रेझ कमी होऊन फॅन्सी फटाक्यांना पसंती वाढत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे ध्वनीप्रदुषणाला काही प्रमाणात आळा बसला. मात्र फॅन्सी फटाके इतर फटाक्यांच्या तुलनेत जास्त किमतीचे असल्याने अनेकांनी साध्या फटाक्यांवर दिवाळी साजरी केली.