क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौकात बाबुराव शेडमाकेंना अभिवादन

आदिवासी युवा समितीचे आयोजन

गडचिरोली : आदिवासी एकता युवा समितीतर्फे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक गोकुळनगर येथे राष्ट्रीय शहीद, वीर बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उमेश उईके, डॉ.कीर्तिकुमार उईके यांनी उपस्थित राहून वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्य, बलिदान व आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती दिली.

यावेळी वक्त्यांनी आदिवासी समाजातील युवकांनी शेडमाके यांच्या प्रेरणेतून संघटित होऊन समाजाच्या हक्क व अस्तित्व रक्षणासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन समितीचे सचिव प्रदीप कुळसंगे यांनी, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष मंगेश नैताम यांनी केले. यावेळी आदिवासी एकता युवा समितीचे सल्लागार प्रियदर्शन मडावी, समितीचे संघटक संजय मेश्राम, संघटक माणिक गेडाम, सहसचिव गिरीश उईके, प्रफुल्ल कोडाप, आकाश कोडाप, रमेश चिकराम, प्रवीण कोवे, खुमेंद्र मसराम, प्रदीप वडेट्टीवर, भार्गव कोडाप यांच्यासह समाजातील युवा आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.