गडचिरोली : शहरात जेटीएम स्टार इव्हेंटद्वारा आयोजित ग्लॅम फेस आॅफ महाराष्ट्र सिझन-2 या फॅशन शो स्पर्धेत मेकअप, फॅशन शो आणि अवार्ड शो चे आयोजन केले होते. यात फॅशन शो स्पर्धेत मिस्टर गटात वर्धेच्या सागर भुरे यांनी बाजी मारली. मिसेस गटात चंचल हलदार, मिस गटातून मृणाल प्रवीण मोडक विजेत्या ठरल्या. तसेच किड्स मधून दिशा शिरपूरकरने उत्कृष्ट सादरीकरण करत मुलांमधून विजयी होण्याचा बहुमान पटकावला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री, आ.धर्मरावबाबा आत्राम आणि विशेष उपस्थितीत सिने अभिनेत्री माधुरी पवार होत्या. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक ज्योती उंदीरवाडे-चव्हाण यांनी केलेल्या नियोजनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीसह बाहेरच्या जिल्ह्यातूनही स्पर्धक सहभागी झाले होते.
फॅशन शो मधील मिस्टर गटात धैर्य भैसारे आणि सुदत्ता राजकुमार वाघमारे हे उपविजेता ठरले. मिसेस गटात शैला सिंहगडे आणि प्रांजली नानेटकर उपविजेत्या ठरल्या. मुलांच्या (किड्स) गटात पलक दीपक चौधरी तर मिस गटात प्रतीक्षा टिकेश वाघमारे हे उपविजेते ठरले. परीक्षक म्हणून गणेश व्यवहारे आणि प्रविणा दाधे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाला डॅा.देवराव होळी, शितल सोमनानी, प्रमोद पिपरे, योगिता पिपरे, अॅड.कविता मोहरकर, स्वप्निल लोखंडे, निखिल मून आदींनी हजेरी लावली. स्पर्धेच्या यशस्वीसाठी वर्षा दोनाडकर, हेमलता वाघाडे, सुनिता तागवान, अरुणा राऊत, प्रेमिला अलोने आदींनी सहकार्य केले.
































