कोंबडा बाजारावरील धाडीत रोख रकमेसह 6 दुचाकी जप्त

पोलिसांना पाहताच पळाले आरोपी

चामोर्शी : तालुक्यातील जामगिरी ते गहुबोडी मार्गावरच्या जंगलात सुरू असलेल्या कोंबडा बाजारात झुंज लावून जुगार खेळणाऱ्यांवर चामोर्शी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीची चाहुल लागताच आरोपींनी पळ काढल्यामुळे अवघे 2 हजार रुपये पोलिसांच्या हाती लागले.

याशिवाय 3 जीवंत कोंबडे, कात्या आणि 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. गणेश कुळमेथे आणि सुनील सोयाम अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.