गडचिरोली : फलटण (जि.सातारा) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे कँडल मार्च काढण्यात आला.

आत्महत्येपूर्वी संबंधित डॉक्टर महिलेने सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आपल्या जीविताच्या सुरक्षेबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र त्या तक्रारीकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे एका उच्चशिक्षित महिला डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली.
यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, शहराध्यक्ष सतीश विधाते, रमेश चौधरी, नेताजी गावतुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेक घोंगडे, रुपेश टिकले, लालाजी सातपुते, अभिजीत धाईत, अनिकेत राऊत, स्वप्नील बेहरे , सोनू देशमुख, अतुल राचमलवार, गौरव येणप्रेडीवार, अपर्णा खेवले ,आशा मेश्राम , कविता उराडे, यश देशमुख, जावेद खान, नितेश बाळेकरमकर, संतोष भांडेकर, मिलींद बारसागडे, योगेश नैताम यांच्यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
            
