गडचिरोली : आदिवासीबहुल जिल्ह्यात, अर्थात पेसा कायदा लागू असणाऱ्या क्षेत्रातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात बुधवारी राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार मीणा यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी माजी मंत्री आणि आमदार डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांनी काही उपाय सूचवत पदभरती लवकर करण्याची सूचना केली.

यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, राजेंद्र गावित, काशीराम पावरा, शांताराम मोरे, दिलीप बोरसे, भीमराव केराम, हिरामण खोसकर, नितीन पवार, किरण लहामटे, आमश्या पाडवी, राजेश पाडवी, विलास तरे, हरिश्चंद्र भोये आणि मंजुळा गावित, हेमंत सावरा आदी आमदार उपस्थित होते.
या बैठकीत पेसा भरती प्रक्रियेतील प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि न्याय्य व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना सूचविण्यात आल्या.
 
            
