गडचिरोली : स्वर्गीय तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन आणि शिव मंदिर पोरला तथा दै.गडचिरोली पत्रिका यांच्यावतीने 3 दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन 3 ते 5 नोव्हेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पोरला येथील शिव मंदिरात हा ग्रामगीता वाचन सप्ताह होणार आहे. हभप डोमाजी झरकर महाराजांचे मुखकमलाद्वारे ग्रामगीता वाचन होणार आहे. सप्ताहाची सुरुवात पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, सकाळी 6 ते 8 दरम्यान रामधुन आणि 8 वाजता घटस्थापनेने झाली. सकाळी 9 ते 10 वाजता ग्रामगीता वाचन, दुपारी 2 ते 5 ग्रामगीता वाचन, आणि सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना होणार आहे.
दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, स.6 ते 8 वाजता रामधुन, सकाळी 8 ते 10 दरम्यान ग्रामगीता वाचन, दुपारी 2 ते 5 ग्रामगीता वाचन, सायंकाळी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना आणि रात्रो निरंकारी भजन मंडळ पोरला यांचे भजन होणार आहे.
दिनांक 5 नोव्हेंबरला पहाटे 5.30 वाजता सामुहिक ध्यान, सकाळी 6 ते 8 रामधुन, सकाळी 8 ते 10 ग्रामगीता वाचन, दुपारी 11 ते 12 वाजता निरंकारी भजन मंडळ पोरला यांचे भजन, दुपारी 12 ते 2 गोपालकाल्याचे कीर्तन आणि दुपारी 3 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केशवराव दशमुखे यांनी केले आहे.
            































