
गडचिरोली : आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी मंगळवार व बुधवारी गडचिरोली शहरातील स्नेहनगर, विसापूर परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि स्थानिक समस्या जाणून घेतल्या. गेट व सभागृह दुरुस्ती, सभागृहात टाईल्स व लाईट्स (हाय मास्ट) बसविणे, सिमेंट खुर्च्या बसविणे, शिव मंदिर परिसरातील ओपन जिम दुरुस्ती, तसेच जय बजरंगबली विश्वस्त मंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या सूचनांनुसार संबंधित विभागांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश डॅा.नरोटे यांनी दिले. गडचिरोली शहरातील नागरिकांच्या सुविधा आणि विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, तसेच स्थानिक युवक आशिषजी मेश्राम, राहुल खंडारे, स्वप्निल खंडारे, आकाश भोयर, प्रतिक टेप्पलवार, अक्षय बोदलकर, अंकुश नक्षिने, स्वप्निल बुरांडे, योगेश बुरांडे व इतर नागरिक उपस्थित होते.
विसापूर हेटी येथील नागरिकांशी संवाद
विसापूर हेटी येथेही डॅा.नरोटे यांनी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून लवकरात लवकर त्याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सभापती केशव निंबोड, माजी सरपंच भास्कर कोटगले, राजेश्वर भोयर व ग्रामस्थ उपस्थित होते.
































