रेगडी-हळदवाही क्षेत्रात होणार सभागृहाचे बांधकाम

आ.नरोटे यांनी केला निधी मंजूर

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात सभागृहाच्या बांधकामासाठी आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी स्थानिक विकास निधीअंतर्गत 48 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. यासंबंधीचे पत्र डॅा.नरोटे यांनी स्वत: भाजपचे मछली, मंजेगाव मक्केपल्ली, विकासपल्ली येथील बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांना सुपूर्द केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जेष्ठ नेते बिरेन बिस्वास, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, घोट मंडळाचे अध्यक्ष राकेश सरकार, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या भागातील विविध समस्यांचा पाठपुरावा आपण स्वतः करणार, तसेच या भागात मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेले रस्ते व पुलांचे बांधकाम व इतर समस्यांचा पाठपुरावा सुद्धा आपण करणार असल्याची ग्वाही आ.डॅा.नरोटे यांनी दिली. जिल्हा परिषद क्षेत्रातील 14 गावांच्या सिंचनाकरीता पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच निकाली काढणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आपण तयार करत आहोत. येत्या काळात रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्राचा कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी संदीप भोवरे, सुमेन विश्वास, सुकंठ रॉय, राजू सातपुते, रमेश लेकलवार, विनायक डुबुलवार, विनोद किरमे, महेश विस्वास व कार्यकर्ते उपस्थित होते.